शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

जयंतरावांचा रस सूडबुद्धीच्या खेळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:40 IST

कासेगाव : सर्वोदय साखर कारखाना उभा करण्यासाठी संभाजी पवारांनी रक्ताचे पाणी केले. वसंतदादांशी संघर्ष करून राजारामबापूंसाठी छातीचा कोट केला. बापूंच्या निधनानंतर जयंत पाटलांना खांद्यावर घेऊन ते सांगलीला नाचत गेले. संभाजी पवारांना कळले नसावे, की हे भुताचे पाय आहेत. पायात पाय अडकवल्यानंतर आता त्यांना कळून चुकले आहे. जयंत पाटलांनी नेहमीच सूडबुद्धीने राजकारण करून आपला स्वार्थ साधण्यात रस घेतला, असा घणाघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.

ठळक मुद्देसदाभाऊ खोत : कासेगाव येथील कार्यक्रमात टीका

कासेगाव : सर्वोदय साखर कारखाना उभा करण्यासाठी संभाजी पवारांनी रक्ताचे पाणी केले. वसंतदादांशी संघर्ष करून राजारामबापूंसाठी छातीचा कोट केला. बापूंच्या निधनानंतर जयंत पाटलांना खांद्यावर घेऊन ते सांगलीला नाचत गेले. संभाजी पवारांना कळले नसावे, की हे भुताचे पाय आहेत. पायात पाय अडकवल्यानंतर आता त्यांना कळून चुकले आहे. जयंत पाटलांनी नेहमीच सूडबुद्धीने राजकारण करून आपला स्वार्थ साधण्यात रस घेतला, असा घणाघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.कासेगाव (ता. वाळवा) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, विक्रम पाटील, प्रसाद पाटील, बापूसाहेब शिंदे, नेताजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. नाईक यांचा स्थानिक विकास निधी व इतर माध्यमातून कासेगावमध्ये मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम पार पडला.सर्वोदय कारखान्याबाबतीत पृथ्वीराज पवार यांना झालेल्या शिक्षेचा धागा पकडत खोत म्हणाले की, कारखाना हडप करून आज त्यांच्याच मुलावर हे लोक दावा ठोकतात. निदान राजारामबापूंना त्यांनी केलेल्या मदतीची तरी जाण ठेवायची होती. जिल्ह्यात व वाळवा तालुक्यात त्यांनी नेहमीच सूडबुद्धीचे राजकारण केले. नेर्ले येथे नऊ कोटी रुपये मंजूर करून नवी पाणीपुरवठा योजना आणली. मात्र त्यांच्याच सांगण्यावरून यालाही विरोध केला. वाघवाडी येथील सत्तर एकर जागा हडप करण्याचा डाव उधळून याठिकाणी कृषी विद्यालय मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले.इस्लामपूरची सत्ता गेल्या ३१ वर्षांपासून तुमच्याकडे होती. या काळात जेवढा निधी तुम्ही आणला, तेवढा निधी आम्ही गेल्या सव्वा वर्षात आणला. राजकीय द्वेषापोटी माझ्या गावावर काही मंडळी चौकशी लावत आहेत. मी आधीच फाटका आहे. फाटक्याचं काय फाटत नाही, पण धडक्याचं फार फाटतं हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सांगितले.आ. शिवाजीराव नाईक म्हणाले की, कासेगावने मला नेहमीच मदत केली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही सर्व विकासकामे पूर्ण झाली असून अजूनही भरपूर कामे करायची आहेत. वाळवा तालुक्यातील या अठ्ठेचाळीस गावांत एकोणीस कोटींची कामे केली आहेत. प्रसाद पाटील, संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन ग्रा. पं. सदस्यांचा व सर्व ग्रामपंचायत उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास संजय पाटील, दिनकर जाधव, पांडुरंग वाघमोडे, ज्ञानदेव पाटील, राजेंद्र पाटील, विनोद कांबळे, राजाराम पाटसुते, शहाजी मिसाळ उपस्थित होते.महाडिकांना : टोलाआमदार शिवाजीराव नाईक यांनी या मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून तेच पुन्हा एकदा असणार आहेत. त्यामुळे कोणी कितीही जोर-बैठका काढायला सुरुवात केली तरी, त्याचा काही उपयोग होणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला मंत्री खोत यांनी सम्राट महाडिक यांचे नाव न घेता मारला.